Ad will apear here
Next
स्वरलतेचं शब्दचित्र... (शब्द आईचे, चित्र लेकीचं...)
चित्र : अनुष्का बेडेकर

२८ सप्टेंबर २०२० रोजी स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी ९२व्या वर्षात पदार्पण केले. त्या निमित्ताने, त्यांच्याबद्दलचे हे शब्द-चित्र... माय-लेकीनं काढलेलं...
..........
असे वाटते कधी तुझा स्वर
उंच नभातुन विहरत जातो 
जातो अलगद येतो फिरुनी 
नक्षत्रांचे गाणे गातो 

असे वाटते कधी तुझा स्वर
खोल सागरी अथांग जातो 
गूढ शांतता असते कधी तर   
लहरी रौरव ऐकू येतो 

असे वाटते कधी तुझा स्वर
जलधारांनी सचैल न्हातो 
तृषार्त झाल्या भूमीला मग 
अलगद अपुल्या कवेत घेतो 

असे वाटते कधी तुझा स्वर 
तलवारीसम लखलख करतो 
रणभूमीवर धगधगणारी 
रक्त तांबडी ज्वाला होतो 

असे वाटते कधी तुझा स्वर
प्राजक्ताची पखरण करितो
शुभ्र सुगंधी फुले अर्पुनी 
भणंग जोगी फकीर होतो 

असे वाटते कधी तुझा स्वर
गाभाऱ्यातील नाद अनाहत 
अनुपम कंपन कंठामधल्या 
प्रार्थनेतला अर्थ भासतो 

- डॉ. सौ. अपर्णा अजित बेडेकर 
(#गोदातीर्थ)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XWTZCQ
Similar Posts
स्वरसम्राज्ञी २८ सप्टेंबर हा स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा जन्मदिन. त्या निमित्ताने प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांनी लिहिलेला हा लेख...
आकाशफुले...! जीए नावाचं गूढ थोडंसं उकलताना...! एखादा दिवस आयुष्याला असा काही धक्का देऊन जातो, की त्याची सुखद जाणीव प्रत्येक पावलासोबत जवळ राहते. तो दिवसही मनात वेगळा कप्पा तयार करून स्वतःहूनच त्यामध्ये जाऊन बसतो. अधूनमधून बाहेर डोकावतो, आणि नव्या दिवसावरही तो जुना, सुखद अनुभव गुलाबपाण्यासारखा शिंपडून जातो... अगदी अलीकडचा तो एक दिवस असाच, मनाच्या कप्प्यात जाऊन बसला
कुटुंब दिनानिमित्त दोन कविता : ‘ते माझे घर’ आणि ‘घर असावे घरासारखे’.. १५ मे हा आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन म्हणून साजरा केला जातो. सध्याच्या परिस्थितीत कुटुंबाचे महत्त्व अधिकच अधोरेखित झाले आहे. या पार्श्वभूमीवर, घर म्हणजेच कुटुंब ही संकल्पना नेमकेपणाने उलगडून सांगणाऱ्या दोन कविता प्रसिद्ध करत आहोत. श्रीराम बाळकृष्ण आठवले यांची ‘ते माझे घर’ आणि विमल लिमये यांची ‘घर असावे
सदानंद रेगे मराठी कवितेचा आनंदरसास्वाद घेताना कवी सदानंद रेगे हे नाव राहून गेलं तर तसा फार मोठा फरक पडेल असं नाही. खुद्द रेगेंनाही तसा पडला नाही.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language